Uddhav Thackeray: उध्दव ठाकरे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 

0

मुंबई,दि.१०: Uddhav Thackeray meets Raj Thackeray शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. शिवसेना-मनसे एकत्र निवडणुका लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अशातच आज उध्दव यांनी राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. 

उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा अवघ्या काही आठवड्यांवर असताना आज अचानक ते धाकटे बंधू राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. उद्धव ठाकरे दुपारी 12 च्या सुमारास दादरमधील शिवाजी पार्कजवळ असलेल्या राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोन महत्त्वाच्या सहकाऱ्यांसहीत पोहोचले.

ठाकरे बंधूंच्या भेटीवेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, आमदार अॅड. अनिल परब, मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे उपस्थित होते. 

याआधी गणेशोत्सवा दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सहकुकुटंब शिवतीर्थ येथे जाऊन राज ठाकरे यांच्या घरच्या गणपती बाप्पाचे दर्शनही घेतले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here