Highcourt On Maratha Andolan: मराठा आंदोलन, मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय 

0

मुंबई,दि.२: Highcourt On Maratha Andolan: मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलनावर मोठा निर्णय दिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे आज दुपारी ३ वाजेपर्यंत मुंबई खाली करा असे निर्देश दिले आहेत. 

किती गाड्या आल्या आहेत त्यांचे डिटेल द्या, असे कोर्टाने म्हटले. आम्ही आवाहन केल्यानंतर बरेचसे लोक आता परतत आहेत, असा दावा आंदोलकांच्या वकीलांनी केला आहे. उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबईतील आझाद मैदान येथे सुरु असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तातडीने रेल्वे स्थानक आणि रस्ते रिकामे करण्याचे निर्देश दिले असून आज दुपारी चार वाजेपर्यंत आझाद मैदान वगळता इतर कुठेही आंदोलक दिसता कामा नये असे निर्देश दिले आहेत.

आझाद मैदान रिकामं करण्याचे निर्देश

मुंबई पोलिस अॅक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र दिसत आहे. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. आझाद मैदान रिकामं करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. 

परवानगी नसल्याने तसेच नियमांच उल्लंघन झाल्याने आझाद मैदान खाली करण्याच्या सूचना नोटीसमध्ये आहेत. केवळ पहिल्याच दिवशी परवानगी दिली होती त्यानंतर कोणत्याही दिवशी आंदोलनाला परवानगी नसल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलिस यांनी देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन करण्यात आल्याने जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनाच्या परवानग्या नाकारण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here