Video: रीलच्या नादात युवक धबधब्यामध्ये गेला वाहून 

0

सोलापूर,दि.२५: Video: अलिकडच्या काळात सोशल मिडीयावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेकजण काहीही करत असतात. अनेकांना सोशल मिडीयाचे अक्षरशः व्यसन लागले आहे. अनेकजण तासनतास मोबाईलवर रील पाहत असतात. तर अनेकांना व्हिडीओ तयार करून सोशल मिडीयावर पोस्ट करण्याचे अक्षरशः व्यसन लागले आहे. यासाठी ते काहीही करत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

पर्यटन स्थळावर अनेकजण फिरायला जातात, तसेच काहीजण रील बनवतात. त्यांना मिळणारे लाईक्स, व्ह्यूज पाहून अनेक लोकं, यूट्यूबर्सही सतत रील्स बनवताना दिसतात. मात्र लाईक्स, व्ह्यूजसाठी रील्स बनवण्याच्या नादात ते त्यांच्या जीवाचीही पर्वा करत नाहीत आणि असं काही घडून बसतं ज्यामुळे क्षणात होत्याचं नव्हतं होतं. 

रील बनवण्याचा नाद एका 22 वर्षांच्या यूट्यूबरला आपला जीव गमवावा लागला आहे. युट्यूबरला धबधब्यात रील बनवणे जीवावर बेतले. व्हिडिओ शूट करताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढला अन् तरुण एका झटक्यात वाहून गेला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by SolapurVarta (@solapur_varta)

ही घटना ओडिशा राज्यातील कोरापूट जिल्ह्यातील दुदुमा येथे धबधब्यावर घडली. गंजम जिल्ह्यातील रहिवासी युट्यूबर सागर टुडू एका मित्रासोबत धबधब्यावर व्हिडिओ शूट करण्यासाठी गेला होता. दोघेही ड्रोन कॅमेऱ्याने सुंदर दृश्ये टिपत होते. यादरम्यान, सागरने एका मोठ्या दगडावर उभा राहून व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर माचकुंड धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे धबधब्यातील पाण्याचा प्रवाह वाढला अन् सागर त्यात वाहून गेला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here