मुंबई,दि.१३: मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा उल्लेख करत वायएसआरसीपी पक्षाचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी गंभीर आरोप केला आहे. चंद्राबाबू नायडू हे एनडीचे घटक आहेत. त्यांच्या पक्षाची भाजपा बरोबर युती आहे. नायडू हे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यामार्फत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी सतत संपर्कात असल्याचा दावा जगन यांनी केला आहे.
जगन मोहन रेड्डी म्हणाले आहेत की, “राहुल गांधी जेव्हा मतदानातील गैरप्रकारांबाबत बोलतात, तेव्हा आंध्र प्रदेशातील मतमोजणीतील तफावतीबाबत ते का बोलत नाहीत? आंध्र प्रदेशात जाहीर झालेल्या निकालांमध्ये आणि मतमोजणीच्या दिवशीच्या निकालांमध्ये तब्बल 12.5 टक्के मतांचा फरक आहे. राहुल गांधी अरविंद केजरीवाल यांच्याबाबतही का बोलत नाहीत, जे स्वतः आमदारकीची निवडणूक हरले होते? ते असं का करत नाहीत?”