मुंबई,दि.२०: Manikrao Kokate Video: महाराष्ट्रातील मंत्र्याचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्र्याने स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) विधानमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यानंतर जोरदार टीका सुरु झाली आहे.
रोहित पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळताना दिसत आहेत. माणिकराव कोकाटे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात अडकतात. यांच्या काही वादग्रस्त कृती आणि वक्तव्यांमुळे ते सातत्याने चर्चेत राहिले आहेत. आता ते जंगली रमीची जाहिरात पाहण्यावरुन ट्रोल होऊ लागले आहेत.
काय म्हणाले कोकाटे? | Manikrao Kokate Video
माणिकराव कोकाटे म्हणाले, “वरच्या हाऊसला बिझनेस असल्यामुळे मी वर बसलो होतो आणि हाऊस अडजर्न झालं असावं म्हणून खालच्या हाऊसला काय बिझनेस चालू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला होता. मोबाईल ओपन केल्यानंतर युट्यूबवर येत असतान, अशा प्रकारच्या अनेक जाहीराती या ठिकाणी येतात. आता त्या जाहिराती स्किप कराव्या लागतात. त्या मी स्किप करत होतो. ती जाहीरात स्कीप करण्यासाठी मला दोन-तीन सेकंद लागले. त्यांनी १८ च सेकंदांचा दाखवला आहे. त्यांनी आणखी पुढे दाखवला असता, तर, स्किप केलेलं त्यांनी दाखवलं असतं ना, पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षनेते दाखवणारच नाही.”
रोहित पवार यांची पोस्ट
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?