मुंबई,दि.१२: Jayant Patil Resignation | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करावे अशी मागणी केली होती.महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसातच होणार आहेत. अशातच पाटील यांनी राजीनामा दिला आहे.
शशिकांत शिंदे नवीन प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 15 जुलै रोजी शशिकांत शिंदे पदभार स्वीकारतील. काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बदल करण्यात आले आहेत.

Jayant Patil Resignation: जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
मला पवारसाहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवारसाहेबांचा आहे. पवारसाहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते. त्यानंतर अखेर आज त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.