सोलापूर,दि.१०: Fact Check Marathi News | भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान (India Pakistan War), एकीकडे भारतीय सैन्य पाकिस्तानच्या हल्ल्यांना योग्य उत्तर देण्यात व्यस्त आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावरही (Social Media) एक युद्ध सुरू आहे. ही लढाई पाकिस्तान किंवा त्यांच्या समर्थकांकडून भारताविरुद्ध पसरवल्या जाणाऱ्या बनावट संदेशांविरुद्ध (Fake Messages) आहे.
Fact Check Marathi News | काय आहे पोस्टमध्ये?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या मेसेजमध्ये अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयही यावर जोरदार प्रत्युत्तर देत आहे. अशाच एका व्हायरल मेसेजचे खोटेपणा उघड झाला आहे. या मेसेजमध्ये लोकांना त्यांच्या मोबाईलमधील लोकेशन सर्व्हिस तात्काळ बंद करण्याचा सल्ला दिला जात आहे.

“सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, आम्हाला अधिकृत ईमेल आला असून त्यामध्ये एक महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे. तुमच्या मोबाईलमधील लोकेशन तातडीने बंद करा. असं लक्षात आलं आहे की ड्रोन्सच्या माध्यमातून हल्ला करण्यासाठी जास्त लोकसंख्या असलेली ठिकाणं या लोकेशनच्या माध्मयातून हेरली जात आहेत,” असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
अशा परिस्थितीत, पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा खरा आहे की खोटा हे उघड केले आहे. पीआयबीने म्हटले आहे की एका व्हायरल फोटोमध्ये असा दावा केला जात आहे की ज्यामध्ये एक ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे आणि लोकांना त्यांच्या फोनवरील लोकेशन सेवा (Mobile Location Service) त्वरित बंद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Fact Check | काय आहे सत्य?
पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. भारत सरकारने असा कोणताही सल्ला दिलेला नाही. याचा अर्थ असा की ते गांभीर्याने घेण्याची अजिबात गरज नाही आणि तुम्ही तुमच्या मोबाईलची लोकेशन सेवा देखील बंद करू नये.