मारहाण व तोडफोड प्रकरण १२ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.२६: मारहाण व तोडफोड प्रकरणी न्यायालयाने १२ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मौजे दर्शनाळ, ता. अक्कलकोट येथे दि.२१/११/२०२४ रोजी फिर्यादी हिना पठाण हिचे घरासमोर येऊन यातील आरोपी १) पारप्पा आण्णप्पा माने २) शाहू मसा माने ३) महादेव मसा माने ४) योगेश गोपीनाथ माने ५) ज्ञानेश्वर गौरीशंकर माने ६) सुनंदा गौरीशंकर माने ७) हिराचंद महादेव माने ८) दिपक हिराचंद मस्के ९) राणी बंडू लांडगे १०) श्रीशैल गेनसिध्द माने ११) पंढरी आप्पाराव माने १२) अमर विठ्ठल शिरसट यांनी फिर्यादी तसेच दर्शनाळ येथील लोकांच्या घरावर व मोटार सायकलीवर दगडफेक करुन तोडफोड केल्याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

यात हकीकत अशी की, दि.२१/११/२०२४ रोजी सांयकाळी ७:३० वा. च्या दरम्यान यातील फिर्यादी हिना पठाण हिचे घरासमोर वर नमूद आरोपी हे एकत्र येऊन शिवीगाळ करीत होते. त्यावेळी फिर्यादीने तसे न करण्याबाबत सांगत असतांना आरोपींनी फिर्यादीच्या घरावर दगडफेक केली व घरातील भांडयाची तोडफोड केली. तसेच फिर्यादी ही अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यास गेली असता सर्व आरोपींनी गावातील इतर लोकांच्या घरावर व मोटार सायकलीवर दगडफेक करुन तोडफोड केल्याचे समजले. त्यावरुन आरोपीविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यामुळे आरोपीमार्फत जिल्हा न्यायालय, सोलापूर येथे अटकपूर्व जामीन मिळणेकामी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.

सदर अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲड. मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात यातील आरोपीच्या नातेवाईकांने फिर्यादीच्या नातेवाईकांविरुध्द फिर्याद दाखल केल्यामुळे फिर्यादीने पोलीसांशी संगनमत करुन आरोपीविरुध्द खोटा गुन्हा नोंद केल्याचे युक्तीवाद केला. सदर प्रकरणी जिल्हा न्यायाधिश एस. व्ही. केंद्रे यांनी आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

यात आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. विजय हर्डीकर, ॲड. सतिश शेटे यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲड. दत्तुसिंग पवार यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here