मनमोहन सिंह यांच्याऐवजी या नेत्याला पंतप्रधान केले असते तर…

0

नवी दिल्ली,दि.15: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात अनेक खुलासे केले आहेत. मनमोहन सिंह यांच्याऐवजी प्रणव मुखर्जींना 2012 मध्ये पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतला असता तर 2014 साली परिस्थिती वेगळी दिसली असते, असे मणिशंकर अय्यर यांनी म्हटले आहे. 2014 साली भाजपाची सत्ता आली. 

अय्यर यांनी त्यांच्या नवीन पुस्तकात लिहिले आहे की, 2012 मध्ये राष्ट्रपतीपद रिक्त झाले तेव्हा प्रणव मुखर्जी यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) – II सरकारची सूत्रे द्यायला हवी होती. तेव्हा मनमोहन सिंह यांना राष्ट्रपती बनवायला हवे होते, असे ते म्हणाले.

अय्यर यांनी पुस्तकात लिहिले आहे की, जर हे त्यावेळी केले असते तर यूपीए सरकारचा कारभार लकव्याच्या स्थितीत पोहोचला नसता. मनमोहन सिंह यांना पंतप्रधानपदी कायम ठेवून प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती भवनात पाठवण्याच्या निर्णयामुळे तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची शक्यता संपुष्टात आल्याचे ते म्हणाले. 

अय्यर यांनी त्यांच्या आगामी ‘अ मॅव्हरिक इन पॉलिटिक्स’ या पुस्तकात ही प्रतिक्रिया दिली आहे. पुस्तकात अय्यर यांनी त्यांचे राजकारणातील सुरुवातीचे दिवस, माजी पंतप्रधान नरसिंह राव यांची राजवट, यूपीए-1 मध्ये मंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ, राज्यसभेतील त्यांचा कार्यकाळ आणि त्यानंतर त्यांची झालेली घसरण, राजकारणातून बाहेर पडणे याविषयीही सांगितले आहे. आणि राजकीय पतन नमूद केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here