Allu Arjun: अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक

0

मुंबई,दि.13: Allu Arjun Arrested: अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आली आहे. हैदराबादमधील थिएटरमध्ये पुष्पा-2 चित्रपटाच्या प्रीमियरवेळी चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन याला अटक केली आहे.

‘पुष्पा-2’ चित्रपटाचा प्रीमियर हैदराबाद येथील आरटीसी चौकातल्या संध्या थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. स्क्रिनिंगदरम्यान आलेल्या अल्लू अर्जुन आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी चेंगराचेंगरीत रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी अल्लू अर्जुन याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुन याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी कलम 105, 118(1) अन्वये गुन्हा दाखल केला होता. आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here