मुंबई,दि.2: BJP Leader Deepika Patel: गुजरातमधील सुरतमध्ये भाजपच्या एका महिला नेत्याच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. सुरतमधील अलथाना वॉर्ड क्रमांक 30 मध्ये भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा दीपिका पटेल यांनी स्वतःच्या घरात दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दीपिका पटेलच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आत्महत्येची पुष्टी झाली आहे. पोलिस त्यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासत आहेत. दीपिका पटेलने एवढे मोठे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
दरम्यान, मृताच्या नातेवाईकाने सांगितले की, दीपिका दीर्घकाळ भाजपची कार्यकर्ती होती आणि समाजसेवाही करत होती. यावेळी त्याने सांगितले की, दीपिकाच्या हत्या होईल अशी भिती तिच्या कुटुंबियांना नेहमीच होती. ते पुढे म्हणाले की, आत्महत्येच्या वेळी दीपिकाचे कुटुंबीय आणि मुले घरीच होती आणि तिचा नवरा शेतात होता.
BJP Leader Deepika Patel
धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्याआधी त्यांनी सुरत महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक चिराग सोलंकी यांना शेवटचा फोन केल्याचीही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
34 वर्षीय दीपिका सूरतच्या अलथान भागात राहत होती. तिचा विवाह नरेशभाई पटेल यांच्याशी झाला होता. कुटुंबात दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. पती शेतीचे काम करतात आणि दीपिका भाजपशी सक्रियपणे संबंधित होती. भाजपने दीपिका यांच्याकडे प्रभाग 30 च्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.
NBT च्या रिपोर्टनुसार, दीपिका दोन वर्षांपूर्वीच भाजप नगरसेवक चिराग सोलंकीच्या संपर्कात आली होती. दीपिका पटेलने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दीपिकाने सुरत महानगरपालिकेचे नगरसेवक चिराग सोलंकी यांना शेवटचा फोन केला होता ज्यामध्ये तिने चिरागला आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.