सोलापूर,दि.20: माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज्यात काय वातावरण आहे? असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी आता आपण आपल्या मतदारसंघाबाबत बोलू असे म्हणत मोठे वक्तव्य केले आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
आता आपण आपल्या मतदारसंघाबाबत बोलू नंतर आणि मग परत राज्यभराचे बोलू. या मतदारसंघात मी अनेक वर्षे याच शाळेत मतदान करतो. खासदारकीचे असो की आमदारकीचे असो मी मतदान करत आलो आहे. आज धर्मराज काडादी यांच्यासाठी मतदान करण्यासाठी आलो आहे. धर्मराज काडादी हे सगळ्यांचे ऐकून काम करणारे आहेत. त्यांना भविष्य आहे. असे शिंदे म्हणाले.