राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील यांचा मोठा दावा

0

मुंबई,दि.7: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याने मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादी नेते, मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभा निवडणूक निकालानंतरच्या राजकीय घडामोडींवर मोठा दावा केला आहे. यापूर्वी नवाब मलिक यांनी मोठा दावा केला होता. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबरच असतील, हे आताच सांगणे कठीण आहे. या निकालानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे सांगताच येत नाही.  असे नवाब मलिक म्हणाले होते. 

अजित पवार आज भाजपाबरोबर असले तरी त्यांनी त्यांची विचारधारा सोडलेली नाही. तसेच मीदेखील माझी समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी विचारधारा सोडलेली नाही, असे अजित पवार गटाचे नेते आणि उमेदवार नवाब मलिक यांनी म्हटले होते. आता दिलीप वळसे पाटील यांनी मोठा दावा केला आहे. 

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, पुढचं काही सांगणे आता कठीण आहे. एका बाजूला आघाडी, दुसऱ्या बाजूला युती आहे. दोन्हीकडे 3-3 पक्ष आहेत. उद्या आघाडी सरकार येते की युती सरकार हे थोडावेळ बाजूला ठेवू, पण प्रत्येक पक्षाचे किती आमदार निवडून येतील हे पाहावे लागेल. त्यानंतर त्याचे खरे गणित जुळवले जाईल. त्यात कदाचित निवडणुकीच्या निकालानंतर काही समीकरणे बदलूही शकतात असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. 

6 पक्ष आहेत. केवळ 2-3 पक्ष नाहीत. तसेच निकालानंतर बहुमताचं गणित जुळत नसेल तर सरकार आणण्यासाठी गणित जुळवावे लागेलच. काही ना काही करावे लागेल.त्यामुळे 6 पक्षांचं गणित जुळवण्यासाठी भरपूर वाव आहे असं विधान दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here