महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: सर्व्हेमधून ही माहिती आली समोर

0

मुंबई,दि.31: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यातील जनतेचा कौल कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सर्व्हेमधून जनतेचा कौल कुणाला आहे हे समोर आले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातील एक सर्व्हे समोर आला आहे. सी वोटरनं तो सर्व्हे केला आहे. सी वोटरच्या आकडेवारीनुसार 51 टक्के लोकांचा कल असा होता की ज्यामुळं विद्यमान महायुती सरकारमधील राजकीय पक्षांची चिंता वाढू शकते.  

सी वोटरने केलेल्या सर्व्हेत सध्याच्या भाजप-शिंदे सरकारवर आपण नाराज आहात का आणि हे बदलण्याची आपली इच्छा आहे का? या प्रश्नावर 51.3 टक्के लोकांनी ‘हो’ असे उत्तर दिले. ते म्हणाले, आमच्या मनात राग आहे आणि हे सरकार बदलण्याची आमची इच्छा आहे. तसेच 3.7 टक्के लोकांनी म्हटले आहे की, आमच्या मनात राग आहे, मात्र हे सरकार बदलण्याची इच्छा नाही. 41.0 टक्के लोकांनी सांगितले की ते रागावलेले नाही आणि बदलण्याची त्यांची इच्छा नाही. अर्थात 41 टक्के लोकांना पुन्हा भाजप-शिंदे सरकार हवे आहे. तसेच 4% लोक म्हणाले, सध्या काहीही सांगू शकत नाही. महत्वाचे म्हणजे, 51 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये या सरकारसंदर्भात राग आहे आणि त्यांना हे बदलायचे आहे. 

लोकांना जेव्हा मुख्यमंत्री पदासाठी पसंती विचारण्यात आली तेव्हा 27.6 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावं असं वाटणाऱ्यांची लोकांची टक्केवारी 22.9 टक्के आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला 10.8 टक्के लोकांनी पसंती दिली. शरद पवार यांच्या नावाला 5.9 टक्के लोकांनी तर अजित पवार यांच्या नावाला 3.1 टक्के लोकांनी पसंती दर्शवली.  


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here