नवी दिल्ली,दि.25: काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. ही बैठक दिल्लीत पार पडली. बैठकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या जागावाटपचा तिढा सुटला आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडलेल्या जागेवरुन नाराज आहेत अशी माहिती समोर आली आहे. कांग्रेस नेत्यांनी वाटाघाटी करताना योग्य भूमिका पार पाडली नसल्याचं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं. राहुल गांधी यांनी फक्त हे मत व्यक्त केलं नाही. तर ते काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीतून अर्ध्यातून बाहेर पडले, असे वृत्त खाजगी वृत्तवाहिनीने दिले आहे.
मुंबई आणि विदर्भातील जागा शिवसेना ‘उबाठा’ला सोडल्यामुळे राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याला जागा वाटप करण्यासाठी पाठविले होते. त्यात विदर्भ आणि मुंबईतील काही जागा शिवसेना ठाकरे पक्षाला सोडल्याबद्दल राहुल गांधी यांनी नाराजी सर्वांसमोर व्यक्त केली आहे.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाकरिताही काँग्रेस आग्रही आहे. या जागेकरिता शिवसेना ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई या भागात काँग्रेसला जास्त जागा मिळायला पाहिजे मेरिटच्या आधारावर. पण, आघाडी आमच्या तीन पक्षांची आणि आमचे अजून मित्रपक्ष, या सगळ्यात हा घोळ झाला. आम्ही त्यांना त्या पद्धतीने समजून सांगितलं. त्यांनी समाधान व्यक्त केलं”, असे उत्तर नाना पटोले यांनी दिले.
उद्या बाळासाहेब थोरात…
बाळासाहेब थोरात उद्या उद्धव ठाकरेंकडून जाऊन थोड्याफार जागांबद्दल चर्चा करतील आणि उद्याच राहिलेल्या जागांवरील निर्णय घेतला जाईल अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.