जालना,दि.20: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काय भूमिका घ्यायची, याबाबतचा निर्णय 20ऑक्टोबर रोजी घेण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी घेतली होती. त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार द्यायचे की पाडायचे याबाबतचा मोठा निर्णय जाहीर केला आहे.
हेही वाचा भाजपाची पहिली यादी जाहीर, सोलापूर जिल्ह्यात
मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. जिथे आपला उमेदवार निवडणूक येण्याची शक्यता असेल, तिथे उमेदवार द्यायचे, तर इतर ठिकाणी मराठा आरक्षणालाविरोध असणाऱ्यांना पाडण्याची भूमिका घ्यायची, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
तसेच एससी-एसटी आरक्षण असलेल्या ठिकाणी उमेदवार द्यायचे नाहीत, मात्र तिथे आपल्या भूमिकेला पाठिंबा असणाऱ्यांच्या मागे उभं राहायचं, अशी घोषणाही जरांगे पाटील यांनी केली आहे.
फक्त मराठ्यांच्या मतदानावर…
राज्यात 36 मतदारसंघात फक्त मराठ्यांच्या मतदानावर उमेदवार निवडून येऊ शकतात. ज्यांनी मराठ्यांना संपवलं त्यांना संपवण्यासाठी लढावं लागेल. मात्र समीकरण न जुळल्यास अर्ज मागे घ्यावा लागेल असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. जिथे आपला उमेदवार नाही तेथील उमेदवाराकडून आपल्या मागण्यांशी सहमत असल्याचं बाँडवर लिहून घ्या असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे.
तुम्ही सगळ्या 288 मतदारसंघात अर्ज भरून ठेवा. एका मतदारसंघात दोघा तिघांनी अर्ज भरा. मग आपण बघू की कोण निवडून येऊ शकतो. ज्यावेळी मी सांगेन की अर्ज मागे घ्यायचा. आपण चौफेर वार करायचा आहे. यांची चिरफाड अशी करावी लागणार आहे. अर्ज काढून घे म्हटलं तर नाराज व्हायचं नाही. ज्यांनी मराठ्यांना संपलं त्यांना संपवायचंच गप्प बसायचं नाही. आता तुम्ही फॉर्म भरून या तुमचे पैसे बुडणार नाहीत काढून घे म्हटलं की तुमचे पैसे वापस येतील. नंतर आपण मेरीट नुसार ठरवू, असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत.