भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष करणार काँग्रेसमध्ये प्रवेश 

0

नंदूरबार,दि.5: राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी भाजपाला मोठा धक्का बसणार आहे. अनेक नेते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बदलताना दिसत आहे. नंदुरबार जिल्ह्यातही दोन बड्या नेत्यांनी राजीनामा दिला आहे. त्यातील एक हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित हे आहेत. तर दुसरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी हे आहे. या दोघांनी ही विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. हे दोघेही शहादा-तळोदा मतदार संघातून काँग्रेसकडून इच्छुक आहेत. 

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ते शहादा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी ही मागितली आहे. राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेस इच्छुकाच्या मुलाखतीसाठी उपस्थित होते. 

आपण शहादा-तळोदा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. या आधीही आपण इच्छुक होतो पण उमेदवारी मिळाली नव्हती असेही ते म्हणाले. काँग्रेस पक्ष आपल्याला उमदेवारी देईल असा त्यांना विश्वास आहे. तसे झाल्यास विद्यमान भाजपा आमदार राजेश पाडवी यांची डोकेदुखी वाढू शकते. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here