सोलापूर,दि.30: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भाजपा नगरसेवक अरविंद वर्मा यांच्यावर आणि त्यांच्या समर्थकांवर महिलांशी गैरवर्तन केल्याचा तसंच त्यांना अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. आरोप करत त्यांना सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आता पोलिसांनी भाजप नगरसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी तीन महिला आणि एका पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरण काय आहे?
भोपाळमधील शाहपुरा भागातील हॉकर्स स्ट्रीटवरील हा प्रकार आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये महिला नगरसेवक अरविंद शर्मा यांना मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये नगरसेवक आणि समर्थकांवर महिलांनी गैरवर्तन केल्याचा तसंच अपशब्द वापरल्याचा आरोप करत आहेत. या घटमेनंतर दोन्ही पक्षांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यावेळी पोलीस स्टेशनमध्येही मोठा गदारोळ झाला.
अरविंद शर्मा यांच्या मारहणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा अध्यक्ष सुमीत पचौरी यांनी या प्रकरणात नाराजी व्यक्त केली असून त्यांनी तीन दिवसांमध्ये बाजू मांडण्याचे निर्देश शर्मा यांना दिले आहेत.