Solapur: सोलापुरात आयटी कंपनीचे थाटात उद्घाटन

0

सोलापूर,दि.31: Solapur: बांधकाम क्षेत्रात गेली तीन दशकाहून अधीक काळ नाव कमावलेल्या फुरडे ग्रुपने आपल्या फुरडे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या आयटी कंपनीचे बुधवारी थाटात उद्घाटन केले. दमाणीनगर येथे ही आयटी कंपनी सुरु करण्यात आली आहे.

सुनील फुरडे यांचे सुपुत्र रोहन व रोहीत यांनी दमाणीनगर येथील स्वतःच्या जागेत फुरडे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही आयटी कंपनी सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे या बाबत सर्व थरातून कौतुक होत आहे. या नवीन कंपनीच्या निमित्ताने सोलापुरातील युवकांना सोलापुरातच कर्मभूमी निवडण्याची संधी मिळणार आहे.     

सदर कंपनीचे उद्घाटन सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे, लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर शरद ठाकरे व क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष सुनिल फुरडे  यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी खासदार प्रणिताई शिंदे यांनी फुरडे ग्रुपच्या या उपक्रमाला शुभेच्या दिल्या व सोलापुरात उद्योग वाढीसाठी आपण प्रयत्न करणार आहोत. सोलापूर इज़ बेस्ट असा उल्लेख त्यांनी यावेळी केला. सोलापूर हे येत्या काळात उद्योग धंद्यात पुढे आलेले दिसेल असा विश्वास व्यक्त केला.

शरद ठाकरे यांनी सोलापूर हे उद्योगासाठी योग्य असून ग्रामीण भागातून आलेल्या लोकांमध्ये चिकाटी, अडचणीवर मातकरुन मार्गकाढण्याची व पुढे जाण्याची क्षमता असते हे मी व सुनिल फुरडे यांनी दाखवून दिले असल्याचे सांगितले

सुनिल फुरडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले आणि अन्न, वस्त्र , निवारा या मूळ गरजा पैकी निवारा देण्याच्या म्हणजेच बांधकाम क्षेत्रात आम्ही आत्ता पर्यंत होते व आत्ता नवीन अश्या आयटी क्षेत्रात त्यांच्या रोहन व रोहित या मुलांच्या रुपाने आणि फुरडे ग्रुप त्त्याच विश्वासाने उतरत आहोत असे सांगितले.

या उद्घाटन सोहळ्यास किशोर चंडक, राजेंद्र कंसवा, शहाजी पवार, अविनाश महागांवकर, राजेंद्र हजारे, प्रल्हाद काशीद, चंद्रकांत वानकर, शिरीष गोडबोले, प्रियदर्शन शाह, क्रेडाईचे अध्यक्ष अभय सुराणा, इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मोरे, बीएईचे अध्यक्ष कलघुटगी इत्यादी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here