बीड,दि.28: मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी या मूळगावी गावात दगडफेक झाली आहे. यावेळी दगडफेकीत अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या मातोरी या मूळगावात रात्री अचानक दंगल उफाळून आली. राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणामुळे तणावाचे वातावरण आहे. डीजेवरून हा वाद झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मातोरी गावात सध्या प्रचंड तणाव असून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी उपोषण करणारे प्रा. लक्ष्मण हाके हे सध्या अभिवादन दौऱ्यावर आहेत. लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा काल बीडमध्ये आली होती. रात्री गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा नियोजित दौरा हा भगवानगड येथे जाऊन भगवान बाबाचे दर्शन करण्याचा नियोजित कार्यक्रम होता.
मात्र, त्यापूर्वीच सायंकाळी म्हणून जरांगे पाटील यांच्या मूळ गावी मातेरीमध्ये एका डीजेवर दगडफेक झाली आणि त्यानंतर तणाव निर्माण झाला. यावेळी रस्त्यावरील काही गाड्यावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर मातोरी शहरांमध्ये पोलीस दाखल झाले. मात्र, मातेरी शहराच्या दोन्ही बाजूला म्हणजे बीड आणि नगर या दोन्ही दिशेच्या बाजूने रास्तारोको रात्रभर सुरू होते. यानंतर रात्रीपासून मातेरी गावात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. डीजेची मोडतोड करण्यात आली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकाRवर मोठमोठे दगड टाकण्यात आले. दगडफेक झाल्याचे कळताच आसपासच्या गावातून झुंडीच्या झुंडी मातोरीकडे निघाल्या. भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या मातोरी या चिमुकल्या गावात सध्या हजारोंचा जमाव जमला आहे. घटनेची माहिती कळताच बीड पोलिसांनी दंगाकाबू पथकासह प्रचंड फौजफाटा मातोरीकडे रवाना केला.
धनंजय मुंडेंचं ट्वीट
दरम्यान मातोरी गावातील दगडफेकीच्या या घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्वीट केलं आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात मातोरी परिसरात घडत असलेल्या घटनाक्रमावर मी लक्ष ठेवून आहे. पोलीस प्रशासनास तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले आहेत. माझी बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, तसेच जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द बिघडू देऊ नये, असे धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.