सोलापूर,दि.19: शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचारी यांना आनंदी निवृत्तीदिन योजनेनुसार सेवानिवृत्तीच्या दिनांकास सेवानिवृत्ती विषयक लाभ मिळणे आवश्यक आहे. परंतु सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांना वेळेत लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये प्रलंबित असलेल्या सेवानिवृत्ती प्रकरणांचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने दिनांक 20 व 21 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात शिबीराचे आयोजन करयात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.
जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचा निवृत्तीवेतन हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने निवृत्तीवेतन विषयक लाभ वेळेवर प्रदान करण्याच्या दृष्टीने त्याचे सेवापुस्तकातील अपुर्ण नोंदी, सेवापुस्तक वेतन पडताळणी या सर्व बाबी पूर्ण होण्याच्या दृष्टीने व काही कर्मचारी हे सेवेत असताना मृत्यु पावलेले आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या वारसास देय असणारे लाभ वेळेत अदा होणेच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये प्रलंबित असलेल्या सेवानिवृत्ती प्रकरणांचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने दिनांक 20 व 21 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, येथील बहुउद्देशीय सभागृह येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरास जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील सेवानिवृत्त प्रकरणांचे कामकाज पाहणारे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी परिपूर्ण आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहणेबाबत कळविण्यात आले आहे. तसेच ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची सेवानिवृत्त प्रकरणे काही कारणामुळे प्रलंबित आहेत अशा जास्तीत जास्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी या शिबीराच्या दिवशी उपस्थित राहून शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केलेले आहे.