बनावट आधार कार्डद्वारे संसद भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न फसला

0

नवी दिल्ली,दि.7: बनावट आधार कार्ड बनवून संसद भवन संकुलात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन मजुरांना सीआयएसएफने अटक केली आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, “बनावट” आधार कार्ड वापरून उच्च-सुरक्षा असलेल्या संसदेच्या संकुलात प्रवेश करण्याचा कथित प्रयत्न करणाऱ्या तीन मजुरांना CISF कर्मचाऱ्यांनी पकडले.

खरं तर, 4 जून रोजी संसद भवनाच्या फ्लॅप गेटवर पास तपासणीदरम्यान, CISF जवानांनी 3 मजूर कासिम, मोनिस आणि शोएब यांना पकडले, जे बनावट आधार दाखवून पीएचसीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. ते तीन मजूर डीव्ही प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीचे असल्याची माहिती तपासात उघड झाली. हे तीन मजूर आयजी ७ मध्ये एमपीच्या लाउंजच्या बांधकामासाठी आले होते. पुढील तपासासाठी या मजुरांना संसद मार्ग पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

बनावट आधार कार्डद्वारे प्रवेश करण्याचा प्रयत्न

या तिन्ही लोकांवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत बनावटगिरी आणि फसवणुकीशी संबंधित आरोप ठेवण्यात आले आहेत. तिघेही त्यांचे आधारकार्ड दाखवून संसदेच्या संकुलात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते आणि यावेळी सीआयएसएफच्या जवानांना त्यांची कार्डे संशयास्पद वाटली. त्यानंतर आधार कार्ड तपासले असता ते बनावट असल्याचे आढळून आले.  
यानंतर संसद भवनाच्या सुरक्षेसाठी तैनात इतर सुरक्षा यंत्रणांचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांची कसून चौकशी केली. तपासादरम्यान या तिघांना डीव्ही प्रोजेक्ट्स लिमिटेडने कामावर घेतल्याचे समोर आले. ते आयजी 7 मध्ये एमपी लाउंजच्या बांधकामात गुंतले होते. या तिघांनी आधार कार्ड कधी, कुठे आणि कसे बनवले, याचा तपास सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here