एसटी कर्मचाऱ्यांचा संप: मंत्री अनिल परबांनी केलं आवाहन

0

मुंबई,दि.13: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण अशा प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी आग्रही आहेत. आझाद मैदानावर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कुटुंबासह ठिय्या आंदोलन हाती घेतले आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी सर्वच पातळीवर चर्चा सुरु आहे. आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) आणि एसटी कर्मचाऱ्यांकडून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (bjp mla gopichand padalkar) यांच्यासोबत बैठक पार पडली. पण, या बैठकीत अजून कोणताही निर्णय होऊ शकला नाही.

या बैठकीबाबत गोपीचंद पडळकर म्हणाले की, आजच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. अद्याप संप मागे घेतला नाही. 12 आठवड्यांची मुदत कमी करण्यासाठी सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. समितीचा अहवाल येत नाही, तोवर सरकार काही करू शकत नाही, अस सरकारच म्हणणं आहे. आम्ही आता आझाद मैदानावर जाऊन चर्चा करू, आम्हालाही संप ताणायचा नाही. ठराविक वेळ द्या. विलीनीकरण हा महत्वाचा विषय आहे, त्यामुळे निलंबनाची चर्चा नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांना काय वाटतं याला मी काडीची किंमत देत नाही असा टोला पडळकर यांनी लगावला.

विलीनीकरण मागणी अतिशय आग्रही होती. मात्र ही मागणी मान्य करु शकत नाही. कारण न्यायालयाचा आदेश नुसार समिती गठीत केली आहे. समितीचा कालावधी कमी करू असं आम्ही सांगितलं आहे. 12 आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी कामगारांना वेतन मिळावे अशी मागणी त्यांची आहे. त्याबद्दल सरकार सकारात्मक आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.

एखादी गोष्ट कोर्टासमोर असेल तर जास्त वेळ आंदोलन करणे योग्य नाही. त्यामुळे एसटी कामगारांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत. वेतन वाढ मागणी आहे.शासनाच्या प्रमाणे वेतन यावर किती बोजा येतो याचा विचार करुन निर्णय घेणार आहोत. आता ते पुन्हा एकदा कामगार यांच्या सोबत चर्चा करायाला गेले आहे. आडमुठी भूमिका घेतली नाही पाहिजे. मी कधी ही त्यांना भेटायला तयार आहे, असंही परब यांनी सांगितलं.

दोन वर्षात एसटीच्या नुकसानीचा आढावा त्यांच्या समोर ठेवण्यात आला आहे.संप चालण हे एसटी आंणि कामगार यांच्या दृष्टीने योग्य नाही. काही कामगार हे कामावर परत येण्यासाठी तयार आहे. त्यांना पोलीस संरक्षण देऊन कामावर हजर होऊ देणार आहे, असंही परब यांनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here