मुंबई,दि.28: बिहारमध्ये तीन दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला, त्यानंतर महाआघाडीचे सरकार पडले. आता नितीशकुमार आज संध्याकाळी पुन्हा एकदा एनडीएच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतात. भाजपासोबत नव्याने सरकार स्थापनेचा दावा देखील केला आहे.
राजभवनात राज्यपालांना भेटून नितीश कुमार यांनी त्यांना सांगितले की, आम्ही राज्यातील महागठबंधनशी म्हणजे लालू यादव राष्ट्रीय जनता दलाशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ‘महागठबंधन’ राजवट संपवून नितीश कुमार हे भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) पुन्हा सामील होणार असल्याचेही जवळपास निश्चित आहे.
राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी लालू यादव यांच्या पक्षावर जोरदार निशाणा साधला. राजभवनातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले, ‘आमच्या पक्षाच्या मतानंतर मी राजीनामा दिला. ते म्हणाले की, सरकारच्या सर्व कामांचे श्रेय राजद घेत आहे, मी काम करत होतो पण मला काम करू दिले जात नव्हते, दोन्ही बाजूंनी पेच निर्माण झाला आहे.’
एकच पक्ष श्रेय घेत होता
राजभवनातून बाहेर आल्यानंतर नितीश कुमार म्हणाले, ‘तुम्ही सर्वांना सांगा की आज आम्ही राजीनामा दिला आणि विद्यमान सरकार संपले. सर्व काही व्यवस्थित होत नसल्याने राजीनामा देण्याची गरज निर्माण झाली. आम्ही काहीही बोलणे बंद केले होते, सर्वांचे मत येत होते, पक्षाचे मत सर्व बाजूंनी व्यक्त होत होते, त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला.
ते म्हणाले, ‘दीड वर्षांपूर्वी झालेल्या महायुतीतही परिस्थिती चांगली दिसत नव्हती. एका पक्षाकडून ज्या प्रकारचे दावे केले जात होते ते आम्हाला वाईट वाटले.








