मुस्लीम समाजाच्या रॅलीला हिंसक वळण, दगडफेकीत 2 पोलीस जखमी

0

दि.13: मुस्लीम समाजाच्या रॅलीला हिंसक वळण लागलं आहे. अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. दगडफेकीत नांदेडमध्ये 2 पोलीस जखमी झाले आहेत. त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी अनेक दुकानांची तोडफोड केली तर अनेक दुकानं जबरदस्तीनं बंद करण्यात आली.

नांदेड शहरात देखील याचे पडसाद उमटले. शहरातल्या शिवाजीनगर, केळी मार्केट, देगलूर नाका परिसरात तुफान दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. व्यावसायिकांच दुकानं आणि खासगी वाहनांसह पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. त्यामुळं दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. दगडफेक करतानाची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here