मुंबई,दि.13: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 152 निवडून येतील असा दावा त्यांनी केला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 80 टक्के म्हणजे तब्बल 152 जागा निवडून येतील, असा ठाम दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केला. त्यांच्या या दाव्यामुळे भाजपचे मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटासह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला किती जागा मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महायुतीचे 206 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रात आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत. यात प्रत्येक निवडणुकीत भाजप नंबर एकवर असेल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसमध्ये नाराज लोकांचा मोठा ग्रुप आहे, त्यांना धीर देण्यासाठी नाना पटोलेकडून वक्तव्य सुरू आहेत. महायुतीत ही 206 पेक्षा जास्त आमदार झाले आहेत.
152 जागांवर भाजपा विजयी होणार: चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुतीमध्ये आम्हाला ज्या जागा मिळतील त्यापैकी 80 टक्के जागांवर आमचा विजय होईल म्हणतानाच 80 टक्के म्हणजे 152 जागांवर आम्ही विजयी होऊ असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या दाव्यामुळे महायुतीत 152 च्यावर जागा जर भाजपला मिळणार असतील तर शिंदे गट, आणि अजित पवार गटाला नेमक्श किती जागा मिळणार हा सवाल उपस्थित होत आहे. 2024 च्या निवडणुकीत 152 भाजप आणि शिंदे- अजित पवार मिळून 200 च्या वर जागा मिळवू असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.
आम्ही राज्याच्या दृष्टीने गणिते आखली आहेत. त्यानुसार आगामी सर्वच निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष असेल, असे बावनकुळे म्हणाले. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे पक्षावर नाराज नसल्याचेही नमूद केले. पंकजा मुंडे यांच्या लहान बहिनीची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाही. पण त्या बीड लोकसभा मतदारसंघात जोरदार तयारी करत आहेत, असे ते म्हणाले.