Ajit Pawar On NCP Crisis: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इतिहास सांगितला म्हणाले…

0

मुंबई,दि.५: Ajit Pawar On NCP Crisis: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड का केले ते सांगितले. मी जातीपातीचे, नात्यागोत्याचे राजकारण केले नाही. मी त्यात अडकलो नाही. कुणी कार्यकर्ता आला तरी त्याचे काम करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. सकाळी लवकर कामाला सुरूवात करतो. देशाचे पहिल्या नंबरचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख झाली पाहिजे हे माझे स्वप्न आहे. ही वेळ राष्ट्रवादीवर का आली? मी राजकीय जीवनात काम करताना साहेबांच्या छत्रछायेखाली मी घडलोय, तयार झालोय यात तिळमात्र शंका नाही. प्रत्येकाचा काळ असतो. आपण साधारण वयाच्या २५ व्या वर्षापासून ७५ पर्यंत उत्तमरितीने काम करू शकतो असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

काय म्हणाले अजित पवार? | Ajit Pawar On NCP Crisis

अजित पवार म्हणाले की, साहेबच आमचे दैवत आहेत. आज देश आणि राज्य पातळीवर राजकारण सुरू आहे. राजकीय पक्ष लोकांच्या हितासाठी काम करण्यासाठी स्थापन करतोय. संविधानाचा, देशहितासाठी, सर्व समाजातील घटकांना न्याय मिळावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वप्न साकार करण्यासाठी आपण काम करतोय. पक्ष वाढला पाहिजे, खासदार, आमदारांची संख्या वाढली पाहिजे. नवीन कार्यकर्ते पुढे आले पाहिजे हे चक्र असले पाहिजे असं त्यांनी म्हटलं.

पाच बैठका त्याच बंगल्यात झाल्या

२०१७ ला प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील बाकीचे वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. समोरून सुधीर मुनगंटीवार, फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांतदादा हे चौघं होती. कोणती खाती, कोणती पालकमंत्री पदं सगळं, मी महाराष्ट्राला खोटं बोलणार नाही. खोटं बोललो तर पवारांची अवलाद सांगणार नाही. सगळं ठरलं, निरोप आला तटकरेंना दिल्लीला बोलावलं. त्यांच्या वरिष्ठांबरोबर आपले वरिष्ठ मीटिंग झाली. 25 वर्ष आमचा मित्रपक्ष आम्ही सोडणार नाही, असं सांगितलं. तेव्हा आमचे वरिष्ठ म्हणाले शिवसेना आम्हाला चालत नाही. भाजप म्हणाले, आम्ही शिवसेनेला सोडणार नाही. 2019 ला निकाल लागले, परिस्थिती काय होती माहिती आहे. मोठे उद्योगपतीच्या घरी, आपले वरिष्ठ नेते, दुसरे वरिष्ठ नेते पटेल, उद्योगपती भाजपचे वरिष्ठ नेते मी आणि देवेंद्र फडणवीस सगळी चर्चा झाली. पाच बैठका त्याच बंगल्यात झाल्या. मला आणि देवेंद्रला सांगितलं कुठे बोलायचं नाही. नेत्यांनी सांगितलं म्हणून बोललो नाही. मला कुणाला बदनाम होऊन द्यायचं नाही. हे सगळं सुरू असताना अचानक बदल झाला आणि सांगितलं शिवसेनेसबोत जायचं. २०१७ ला शिवसेना जातीयवादी आणि दोन वर्षांनी ते मित्रपक्ष झाला आणि भाजपसोबत जाणार होतो तो भाजप जातीयवादी झाला. असं चालत नाही.- अजित पवार

पूलोद सरकारमध्ये जनसंघ होता, जो आता भाजपा आहे. १९८० मध्ये इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या. इतिहास पाहिला तर कुणी ना कुणी करिश्मा असणारे नेतृत्व लागते. लोकशाही आहे हे घडले आहे. जयप्रकाश नारायण यांचे ऐकून लोकांनी जनता पक्षाला निवडून दिले. करिश्मा असणारा नेता नसल्याने जनता पक्ष आता कुठेही नाही.

उत्साह, जोश, समाजासाठी काम करण्याची जिद्द असते. परंतु हे घडताना आम्हाला, जनतेला सांगितले की, १९८६ मध्ये समाजवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये सामील झाली. त्यानंतर १९८८ मध्ये शरद पवारांना मुख्यमंत्रिपद दिले. ९१ ला राजकारण बदलले. मला बारामतीकरांनी खासदार केले. त्यावेळी राजीव गांधी आपल्यातून निघून गेले. एक लाट आली पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान झाले. शरद पवार संरक्षणमंत्री झाले. ९५ मध्ये आपले सरकार गेले. भाजपा-शिवसेना युती सरकार आले. तो काळही आपण पाहिला.

१९९९ मध्ये सोनिया गांधी परदेशी आहेत हे आम्हाला सांगितले. परदेशी व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही असं म्हटलं आपण ऐकले. १९९९ साली सगळ्यांनी पुढाकार घेतला राष्ट्रवादीची स्थापना झाली. ६ महिन्यात निवडणुका लागल्या. तेव्हा शिवाजी पार्क संपूर्ण मैदान गाजवण्याचे काम भुजबळांनी केले. नेत्यांच्या मार्गदर्शनासाठी काही तरी केले पाहिजे. सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवला पाहिजे असं आम्हाला वाटले. पहिल्या टर्ममध्ये आम्हाला मंत्रिपदे दिली.

राष्ट्रवादीच्या सगळ्यात जास्त जागा आल्यानंतर काँग्रेसने मुख्यमंत्रिपद पक्षाला देण्याची तयारी केली. पण ४ मंत्रिपदे जास्त घेऊन आलेली संधी गमावली. २००३ मध्ये ती संधी घेतली असती तर आजतागायत राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राज्यात दिसला असता. आम्ही लोकांमध्ये मिसळलो, वडिलधाऱ्यांचा आदर केला. आमदारांनी काम करावे. विकास करावा. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला पुढे घेऊन जावे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here