Virender Sehwag Tweet: वीरेंद्र सेहवागने व्हिडिओ शेअर करत केले महेंद्रसिंह धोनीचे कौतुक

0

मुंबई,दि.30: Virender Sehwag Tweet: वीरेंद्र सेहवागने व्हिडिओ शेअर करत महेंद्रसिंह धोनीचे (MS Dhoni) कौतुक केले आहे. चेन्नई सुपर किंग्जनं (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सवर मात करुन आयपीएलचा (IPL 2023 Final) खिताब पाचव्यांदा आपल्या नावे केला. या सामन्या चाहत्यांचा लाडका महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) जलवा पाहायला मिळाला. सामन्या दरम्यान धोनीनं पुन्हा एकदा त्याची कमाल दाखवून दिली. फायनल्समध्ये जाण्यापासून मुंबईला रोखण्यात सर्वात मोठा वाटा होता, तो गुजरातच्या शुभमन गिलचा. चेन्नईसमोरही शुभमन गिलचंच आव्हान होतं. पण धोनीनं दाखवलेल्या तत्परतेमुळे शुभमन नावाचं वादळ रोखण्यात चेन्नईला यश आलं. धोनीनं असं काही केलं की, ते पाहून तुम्हीही म्हणाल, विकेटकिपर हवा धोनीसारखाच… हा व्हिडीओ पाहून खुद्द वीरेंद्र सेहवागही (Virender Sehwag) धोनीचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.

वीरेंद्र सेहवागने व्हिडिओ शेअर करत केले महेंद्रसिंह धोनीचे कौतुक | Virender Sehwag Tweet

एमएस धोनी विजेच्या वेगानं स्टंपिंग करत शुभमन गिलला आऊट केलं. या स्टंपिंग दरम्यान धोनीचा रिॲक्शन टाईम हा केवळ 0.1 सेकंदापेक्षा कमी होता. रवींद्र जाडेजाचा तो चेंडू टर्न घेत होता, अशा स्थितीत शुभमन गिलनं पुढे जाऊन डिफेंसिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण स्टंपमागे धोनी उभा होता, गिलचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि गिल स्टंप आऊट झाला. धोनीनं क्षणार्धात गिलला स्टंपआऊट केलं. रिप्लेमध्ये दिसलं की, गिल वेळीच आपला पाय क्रीजमध्ये आणू शकला नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विकेटमागे उभ्या असलेल्या धोनीच्या स्टंपिंगचा व्हिडीओ पाहून टीम इंडियाचा माजी स्टार फलंदाज वीरेंद्र सेहवागही धोनीचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. सेहवागनं त्याच्या हटके शैलीत धोनीचं कौतुक केलं आहे. “खूप छान! तुम्ही बँकेतून नोटा बदलू शकता, पण विकेट मागच्या MS धोनीला बदलू शकत नाही… एमएस धोनी नेहमीसारखाच वेगवान.”

टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या एमएस धोनीनं आतापर्यंत आपल्या शानदार कारकिर्दीत विकेटच्या मागे उभं राहुन भल्याभल्या फलंदाजांना माघारी धाडलं आहे. आतापर्यंत धोनीनं 180 विकेट्स घेतले आहेत, ज्यामध्ये 42 स्टंपिंगशिवाय 138 कॅचेस आहेत. धोनी हा आयपीएलचा सर्वात यशस्वी विकेटकिपर आहे. विकेटकिपिंग करताना सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये धोनी सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ 169 विकेट्ससह दिनेश कार्तिक दुसऱ्या क्रमांकावर आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here