Narhari Zirwal Video: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल

0

मुंबई,दि.२१: Narhari Zirwal Video: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) हे आपल्या साधारणपणामुळे कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी पत्नीसह त्यांनी विदेश दौरा केला, त्या दौऱ्यातील त्यांचा व त्यांच्या पत्नीचा साधेपणा अनेकांना भावला. तर, यापूर्वीही आपल्या गावाकड एका कार्यक्रमात ते लोकगीतांवर डान्स करताना दिसून आले होते. आता, पुन्हा एकदा त्यांचा डान्स व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी चक्क पत्नीला खांद्यावर घेऊन डान्स केला आहे. गावाकडे कार्यक्रमात विधानसभा उपाध्यक्षांनी चांगलीच संधी साधली आणि पत्नीला खांद्यावर घेऊन डान्स केला. 

नरहरी झिरवळ यांचा डान्स करतानाचा… | Narhari Zirwal Video

नरहरी झिरवाळ यांनी पत्नीला खांद्यावर घेत संभळ या वाद्यावर डान्स केला. विशेष म्हणजे पत्नीला खांद्यावर घेत दोन हातांनी तिचे हात पकडत संभळच्या तालावर नृत्य केलं. त्यांचा हा डान्स आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, राज्यात काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल दिला. तत्पूर्वी नरहरी झिरवळ हे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत होते, त्यांच्या नावाने मिम्सही व्हायरल झाले होते. 

दरम्यान, त्यांचा हा डान्स करताना अनेकांनी दाद दिली, तसेच व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करुन तो सोशल मीडियावरही शेअर केला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here