समीर वानखेडे यांच्या निकाहनामा बद्दल क्रांती रेडकरने दिले प्रत्युत्तर

0

मुंबई,दि.२७: NCB मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या निकाहनामा बद्दल त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने (वानखेडे) स्पष्टीकरण दिले आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो व निकाहनाम्याला फोटो शेअर करत पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांवर समीर वानखेडे यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नवाब मलिक यांनी आज सकाळीच एक ट्वीट करत समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो शेअर केला होता. तसंच, निकाह कधी व कसा झाला याबाबतबी माहिती दिली आहे. गुरुवारी ७ डिसेंबर २००८ रोजी आठ वाजता समीर दाऊद वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी यांचा निकाह अंधेरी पश्चिममधील लोखंडवाला कॉम्पलेक्स येथे झाला होता, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच, मेहर म्हणून ३३ हजारांची रक्कम घेण्यात आली होती, असं ट्वीट नवाब मलिक यांनी केलं होतं. तर, ट्वीटमध्ये त्यांनी ‘निकाह नामा’ देखील जोडला आहे. यामध्ये समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख आहे. यामुळं पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. या सगळ्या प्रकरणावर क्रांती रेडकर हिने भाष्य केलं आहे. तसंच, नवाब मलिक यांचा दावा फेटाळून लावला आहे.

‘निकाहनामा हा खरा आहे. समीर वानखेडे यांचा निकाहदेखील झाला होता. पण त्यांनी धर्म व जात बदलली नाहीये. माझ्या सासूबाईंच्या आनंदासाठी समीर वानखेडे यांनी निकाह केला होता. कारण त्या मुस्लिम होत्या. निकाहनाम्याचे पेपरही सासूबाईंनी बनवले होते,’ असं स्पष्टीकरण क्रांती रेडकरने दिलं आहे.

‘नवाब मलिक यांनी शेअर केलेला जन्माचा दाखला चुकीचा आहे. आमचे खासगी फोटो सर्वांसमोर आणून नवाब मलिक हे त्यांनी घेतलेल्या शपथेविरोधी काम करत आहेत. आम्ही लवकरच त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करु. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करु. समीर वानखेडे यांना पदावरून हटवण्याचा त्यांचा एकच हेतू आहे, जेणेकरून त्यांच्या जावयाला वाचवता येईल,’ असंही क्रांती रेडकरनं म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here