महिला पोलीस सब इन्स्पेक्टरला ५ हजारांची लाच घेताना पकडले, Video व्हायरल

0

भिवानी,दि.२९: महिला पोलीस सब इन्स्पेक्टरला ५ हजारांची लाच घेताना पकडले आहे. सोशल मीडियावर Video व्हायरल झाला आहे. हरयाणातील भिवानी आणि हिसार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करत एका महिला पोलीस सब इन्स्पेक्टरला रंगेहात पकडलं. एका महिलेच्या खटल्याप्रकरणात या महिला पोलीस अधिकाऱ्याने ५ हजार रुपयांची लाच घेतली होती. त्यावेळी, पथकाने तिथे धाड टाकली असून रंगेहात अटक केली. त्यानंतर, महिला पोलीस उपनिरीक्ष मुन्नी देवी यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. 

भिवानीच्या बवानखेडी येथील ही घटना असून सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला आहे. बवानीखेडी पोलीस ठाण्यात मुन्नी देवी पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. या ठाण्यात एका महिलेचा खटला सुरू होता, त्यामध्ये काही पैशांची रुकव्हरी करायची होती. मात्र, या रिकव्हरीसाठी तपास अधिकारी असलेल्या मुन्नी देवी यांनी पीडिताकडे ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. 

याप्रकरणी तक्रारदार महिलेने भिवानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. त्यावरुन, हिसार आणि भिवानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संयुक्तपणे कारवाई करत मुन्नी देवी यांना रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या १० नोटाही जप्त करण्यात आल्या. भिवानी लघु सचिवालयाजवळ ही कारवाई करण्यात आली. येथील व्हिडिओही काढण्यात आला असून संबंधित महिला अधिकाऱ्याच्या खिशातून ती ५ हजार रुपये व्हिजिलन्स अधिकाऱ्याकडे देत असल्याचे दिसून येते. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here