कसबा पोटनिवडणूकीत भाजपा उमेदवार पिछाडीवर, तर चिंचवडमध्ये आघाडीवर

0

पुणे,दि.2: Kasba Chinchwad Vote Counting Update: कसबा पोटनिवडणूकीत भाजपा उमेदवार पिछाडीवर, तर चिंचवडमध्ये आघाडीवर आहे. गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निकालाचा पहिला कल हाती आला आहे. कसब्यात रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरूवात झाली आहे. पोस्टल मतदानामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली आहे. पहिला कल हा धंगेकरांच्या बाजूने लागला आहे. धंगेकर तब्बल 2200 मतांनी आघाडीवर आहे. तर चिंचवडमध्ये पहिला कल हा भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या बाजूने लागला आहे. अश्विनी जगताप पहिल्या राऊंडमध्ये 452 मतांनी आघाडीवर आहे.

या दोन्ही जागांसाठी रविवार 26 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. कसब्यामधून भाजपचे हेमंत रासने यांचा सामना काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याशी होता. तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. चिंचवडमध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर राष्ट्रवादीने नाना काटे यांना रिंगणात उतरवलं. अपक्ष म्हणून राहुल कलाटेही रिंगणात उतरले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here