सोलापूर,दि.25: Accident News: सोलापुरातील चौघांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन दिवसापूर्वी जुळे सोलापुरातील नऊ जण तिरूपती येथील बालाजीच्या दर्शनासाठी सोलापुरातून कारमधून गेले होते. या अपघाताची माहिती आंध्रप्रदेशातील माध्यमांनी दिली आहे.
जुळे सोलापुरातील नऊ जण गेले होते दर्शनासाठी | Accident News
दरम्यान, पोलिसांनी दिलेली माहितीनुसार मागील दोन दिवसापूर्वी जुळे सोलापुरातील नऊ जण तिरूपती येथील बालाजीच्या दर्शनासाठी सोलापुरातून कारमधून गेले होते. बुधवारी तिरूपतीचे दर्शन घेऊन कनिपमकडे जात असताना अचानक कार दुभाजकाला धडकून अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रगिरी मंडळातील नायडूपेट-पूथलापट्टू मुख्य रस्त्यावर ही घटना घडली.
जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून तिरुपती रुईया रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पश्चिम डीएसपी नरसप्पा रुया रुग्णालयात पोहोचले. चंद्रगिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.