नागपूर,दि.13: काँग्रेस आमदार सुनील केदार (Congress MLA Sunil Kedar) यांना न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षा सुनावली आहे. 2017 मध्ये महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सुनील केदार (MLA Sunil Kedar) यांना दोषी ठरवण्यात आले आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयानं आज हा निर्णय दिला आहे. (Congress MLA Sunil Kedar Sentenced To One Year)
सुनील केदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता | MLA Sunil Kedar
नागपूर येथील केळवद पोलीस स्टेशनमध्ये सुनील केदार यांच्याविरोधात सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. 2017 मध्ये कोराडी ते तिडंगीदरम्यान अतिउच्च दाबवाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना सुनील केदार यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
1 वर्षांची शिक्षा व दोन हजार रुपयाचा दंड | Congress MLA Sunil Kedar
काँग्रेस आमदार सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने 353 च्या गुन्हयात 1 वर्षांची शिक्षा व दोन हजार रुपयाचा दंड सुनावला आहे. 2017 मध्ये नागपूर जिल्हयातील तेलगाव येथे शेतकऱ्यांच्या शेतातून महापारेषणचे टॉवर टाकण्याचे काम सुरु होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत होते व शेतकऱ्यांना त्याची नुकसानभरपाई देखील मिळत नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांनी आमदार म्हणून त्याची तक्रार सुनील केदार यांच्या कडे केली. त्यानंतर लगेच सुनील केदार हे घटनास्थळी पोहचले उपस्थित इंजिनिअर व महापारेषण च्या कर्मचाऱ्यांना मारहाण करत काम बंद पाडले . याची तक्रार केळवद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या प्रकरणात आज नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनील केदार यांना दोषी धरत शिक्षा सुनावली.