कोल्हापूर,दि.२: MLA Prakash Abitkar: महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ पुणे विभागाचे अध्यक्ष सदाशिव बेडगे व शिष्टमंडळाने राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रकाश आबिटकर यांची गारगोटी (कोल्हापूर जिल्हा) येथे भेट घेतली. नुकतेच महाराष्ट्र शासनाने राज्यातील १२१४५ ग्रंथालयांना ६०% अनुदान वाढीचा शासनाने निर्णय घेण्यामागे सातत्याने विधीमंडळ सभागृहात उपेक्षित ग्रंथालय कर्मचारी यांची बाजू लावून धरण्यामागे आमदार प्रकाश आबिटकर यांचा सिंहाचा वाटा होता. (MLA Prakash Abitkar News)
आमदार प्रकाश आबिटकर यांचा सत्कार | MLA Prakash Abitkar
राज्यातील २१६१५ ग्रंथालय कर्मचारी यांची सारथी म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल संघटनेच्या वतीने पेढा भरवून, शाल व बुके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष बेडगे यांनी ग्रंथालय कर्मचारी यांना किमान वेतन मिळणेसाठी ग्रंथालय अनुदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनुदान वाढीसाठी आपण प्रयत्न करावा, अशा मागणीचे निवेदन दिल्याचे बेडगे यांनी सांगितले.
यावेळी नेताजी सारंग, प्रा. डॉ भिमाशंकर बिराजदार, धोंडिराम जेवूरकर, रामचंद्र कदम, सिध्दाराम हलकुडे, गिरीश मठपती, रामचंद्र वग्गे आदी उपस्थित होते.