नागपूर,दि.२९: Maharashtra Assembly Winter Session 2022: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत शिंदे-फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी केली. अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यात महिलांना संधी देण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार चिमटे काढले. तसेच मंत्रिमंडळ विस्तार केल्यानंतर उरलेले आमदार निघून जातील यामुळे घाबरून जाऊ नका, असा टोलाही लगावला. ते गुरुवारी (२९ डिसेंबर) नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात बोलत होते. (Maharashtra Politics)
कुठं कसं काय बोलावं आणि… | Maharashtra Assembly Winter Session 2022
अजित पवार म्हणाले, “देवेंद्र फडणवीस अडचणीच्या विषयांवर बोलले नाही. कुठं कसं काय बोलावं आणि कुठलं बोलू नये, कशाला बरोबर दुर्लक्षित करावं हे फडणवीसांना चांगलं जमतं. मी मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याचा विषय काढला. त्या विषयाला तर फडणवीसांनी स्पर्शच केला नाही. त्यावेळी त्यांनी सुनेत्राताईंचं नाव घेतलं, पण ते वेगळ्या अर्थाने नाव घेतलं. मात्र, मला तसलं काही सांगू नका.”
तिथं आमच्या मंदाताई, मनिषाताई अशा मान्यवर महिला… | Maharashtra Assembly Session 2022
“तिथं आमच्या मंदाताई, मनिषाताई अशा मान्यवर महिला लक्ष ठेऊन आहेत. मी गंमतीने म्हणतो असं नाही. ज्यावेळी आपण राज्याला पुढे घेऊन जात असतो तेव्हा महिलांनाही प्रतिनिधित्व द्या आणि बाकीच्याही जागा भरा. कोणाला घ्यायचं त्यांना घ्या,” असं मत पवार यांनी व्यक्त केलं.
उरलेले आमदार निघून जातील का… | Maharashtra Politics
“मी तुम्हाला सांगतो, तुम्ही घाबरू नका. त्या जागा ४३ केल्या की, उरलेले आमदार निघून जातील का याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण दोघे धरून २० च मंत्री आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आणखी २३ मंत्री करण्याचा अधिकार आहे,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.