वीजचोरी | वाघोलीत पकडल्या मोठ्या वीजचोऱ्या, दोन घटनेत एक कोटी 44 लाखाची वीजचोरी उघडकीस

0

पुणे,दि.21: वीजचोरी | महावितरणच्या भरारी पथकाने नुकतेच वाघोली येथे धाड टाकून एक कोटी 44 लाख व 58 हजार रुपयांच्या दोन वीजचोरीच्या (Electricity theft) घटना उघडकीस आणल्या असून वीज चोरट्याच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. Electricity theft | Big electricity thieves caught in Wagholi, electricity theft of Rs 1 crore 44 lakh revealed in two incidents

मे. रोहन स्टोन क्रशरची वीजचोरी उघडकीस | Electricity theft

पुणे ग्रामीण भागातील वाघोली परिसरात भरारी पथकाने धाड टाकुन मे. रोहन स्टोन क्रशरची वीज चोरी (Electricity theft) उघडकीस आणलेली आहे. या औद्योगिक ग्राहकाचा 103 एच.पी जोडभार असतांना त्यांनी ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्युशन बॉक्स मधुन अतिरिक्त एल. टी. केबल टाकुन मीटर बायपास करून वीज चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. या ग्राहकाने चार लाख 25 हजार 72 युनिटची चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला 74 लाख, 88 हजार 670 रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.

वीजचोरी
वीजचोरी

मे. पृथ्वीराज एन्टरप्रायजेस स्टोन क्रशरने वीजचोरी उघडकीस | Electricity theft

दुसऱ्या एका घटनेत वाघोली परिसरातील मे. पृथ्वीराज एन्टरप्रायजेस स्टोन क्रशरने वीज चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. सदर 95 एच.पी. जोडभार असलेल्या औद्योगिक ग्राहकाने ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्युशन बॉक्स मधुन अतिरिक्त एल. टी. केबल टाकुन मीटर बायपास करून वीज चोरी केल्याचे तपासात आढळून आले. या ग्राहकाने तीन लाख 55 हजार 354 युनिटची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून यासाठी त्याला 69 लाख 67 हजार 500 रूपयांचे वीज चोरीचे बील देण्यात आले आहे.

जाहिरात

चोरीचा गुन्हा दाखल

या दोन्ही औद्योगिक ग्राहकांवर विद्युत कायदा 2003 कलम 135 अन्वये लोणीकंद पोलिस स्टेशन येथे वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

विजय सिंघल यांचे वीजचोरी शोध मोहिम राबविण्याचे आदेश

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मोठया प्रमाणात वीज चोरी शोध मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे व पुणे प्रादेशिक विभागाचे उपसंचालक सुमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता विशाल कोष्टी, सहा. सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी सोनाली बावस्कर व तंत्रज्ञ पवन चव्हाण यांनी मोहिम यशस्वी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here