Sambhajiraje Chhatrapati | “जर माझी भूमिका चुकीची असेल तर सांगावे मी कधीही…” : संभाजीराजे छत्रपती

0

कोल्हापूर,दि.18: संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपटावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ऐतिहासिक चित्रपटांचे पहिलं स्क्रिनिंग महाराष्ट्रात झालं पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी म्हटले आहे. संभाजीराजे यांनी चित्रपटाला कडाडून विरोध केला आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप शिवप्रेमी संघटनांकडून करण्यात आला आहे. तसेच हा चित्रपट टीव्हीवर दाखवू नये अशी भूमिका देखील काही संघटनांकडून घेण्यात आली आहे.

हेही वाचा Vivek Phansalkar: पोलीस आयुक्त विवेक फणसळकर एकुलत्या एक मुलीचा विवाह असताना ऑन ड्युटी

Sambhajiraje Chhatrapati On Har Har Mahadev | संभाजीराजे आक्रमक

संभाजीराजे यांनी चित्रपटाला कडाडून विरोध केला आहे. हर हर महादेव चित्रपटात (Sambhajiraje Chhatrapati On Har Har Mahadev) स्त्रियांविषयी आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. इतिहास संशोधकांनी बोलावे. जर माझी भूमिका चुकीची असेल, तुम्ही सांगावे, मी पुन्हा कधीही अशा चित्रपटांवर पत्रकार परिषद कधीही घेणार नाही. बाजीप्रभू आणि शिवाजी महाराजांची लढाई दाखवणं मान्य आहे का? चुकीचा इतिहास दाखवण्यापेक्षा चित्रपट काढूच नका, खरा इतिहास दाखवा, विरोध थांबवतो, असे संभाजीराजे म्हणाले.

Sambhajiraje Chhatrapati

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इतिहासाची मोडतोड करून चित्रपट दाखवण्यास विरोध आहे. जो इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जातो तोच इतिहास नवी पिढी खरी मानणार. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवला जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. ऐतिहासिक चित्रपटाचे पाहिले स्क्रिनिंग महाराष्ट्रात व्हावे आणि त्यासाठी एक समिती निर्माण व्हावी अशी मागणी छत्रपती संभाजी महाराज यांनी केली आहे.

संभाजीराजे बेळगाव दौऱ्यावर

संभाजीराजे (Sambhajiraje Chatrapati On Har Har Mahadev) आज बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. दौऱ्यापूर्वी त्यांनी हर हर महादेव चित्रपट झी मराठीवर दाखवला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट केली. संभाजीराजे म्हणाले, नव्या पिढीचं वाचन कमी झालं आहे. मी अजून चित्रपट पाहिलेला नाही, पण इतिहासकारांनी हा चित्रपट पाहूच नका असे सांगितले आहे इतक्या चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. ऐतिहासिक चित्रपटासाठी इतिहासकारांची नेमणूक आवश्यक आहे.

‘चुकीचा इतिहास दाखवू नका’

दरम्यान संभाजीराजे यांनी चित्रपटातील विविध दृष्यांवर आक्षेप घेतला आहे. हरहर महादेव सिनेमात जेधे देशमुख बांदल देशमुख यांच्यात वाद दाखवला आहे, मात्र हे दोघेही स्वराज्याची ताकद होते असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. बाजीप्रभू देशपांडे हे सेवक लढवय्या होते, मात्र बाजीप्रभू देशपांडे यांची लढाई शिवरायांसोबत हा कुठला इतिहास आहे? असा सवालही संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. शिवरायांनी स्त्रियांचा सन्मान केला, मात्र या चित्रपटात महिलांचा बाजार दाखवण्यात आला आहे, असा चुकीचा इतिहास दाखवण्यापेक्षा न दाखवलेला बरा असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here