सोलापूर,दि.10: ग्रामदैवत श्री सिध्दमल्लिकार्जुन प्रतिष्ठान सोलापूर यांच्यावतीने वीरशैव लिंगायत समाजातील 5 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्याचे जानेवारी महिन्यात आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती प्रतिष्ठानचे संयोजक गणेश चिंचोळी यांनी दिली.
ग्रामदैवत श्री. सिध्दमल्लिकार्जुन प्रतिष्ठान सोलापूरची स्थापना ही 22 मार्च 2022 रोजी रंगपंचमी दिवशी सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यातील प्रमुख मानकरी, मास्तर, आणि सर्व सेवेधारी यांच्या सन्मान सोहळ्यानं झाली. त्यानंतर दुसऱ्या कार्यक्रमात आठवी ते बारावी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले.
आणि आता वीरशैव लिंगायत समाजातील गोरगरीब लोकांसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 5 जोडप्यांचा हा मोफत विवाह सोहळा असून, काशी जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह विविध मठांच्या मठाधिपतींच्या उपस्थितीत जानेवारी महिन्यात हा विवाह सोहळा होणार आहे.
यासाठी नावनोंदणी आवश्यक असून, नाव नोंदणीकरिता गणेश चिंचोळी 9822024151, सचिन शिवशक्ती 9860205620, आनंद दुलंगे 9372103885, ॲड. बसवराज शेटे 9422370830 यांच्याशी तसेच लंबोदर फूडस् पश्चिम मंगळवार पेठ, बाळीवेस येथे संपर्क साधावा असे आवाहन ग्रामदैवत श्री सिध्दमल्लिकार्जुन प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.