मुंबई,दि.6: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष | सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) शिवसेनेची (Shivsena) मागणी फेटाळली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्तांतर घडवून आणले. शिवसेनेने (ठाकरे गट) 16 आमदारांवर अपात्रेतेची कारवाई करावी म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली होती.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष | एकनाथ शिंदे यांनी सांगितला शिवसेनेवर दावा
यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितला. एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले. शिवसेनेने धनुष्यबाण चिन्हाबद्दल सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे जाण्यास सांगितले. शिवसेनेचे नाव व चिन्ह गोठवले. शिवसेनेला (ठाकरे गट) मशाल चिन्ह मिळाले.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष | शिवसेनेची विनंती सुप्रीम कोर्टाने फेटाळली
शिवसेना कुणाची? या प्रश्नाभोवती राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पण, आता या सत्तासंघर्षावर पुढील वर्षीच सुनावणी होणार आहे. शिवसेनेनं लवकरात लवकर सुनावणी घेण्यास विनंती केली पण सुप्रीम कोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. या प्रकरणावर आता 10 जानेवारीला सुनावणी होणार आहे.
शिवसेनेने सुप्रीम कोर्टात लवकर सुनावणी व्हावी अशी मागणी केली होती
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर लवकर सुनावणी व्हावी, अशी मागणी केली होती. शिवसेनेची बाजू मांडत देवदत्त कामत यांनी सरन्यायाधीशांना विनंती केलेली की, ‘महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार सुरू आहे, त्यामुळे सुनावणी लवकर घेण्यात यावी’ अशी विनंती केली.
सुप्रीम कोर्टाने दिला नकार
पण सुप्रीम कोर्टाने लवकर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. 10 जानेवारी 2023 ला घटनापीठ बसणार आहे. त्याच दिवशी या प्रकरणाची सुनावणी कोणत्या दिवशी होणार हे ठरवले जाईल, असे न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे राज्याच्या सत्तासंघर्षावर सुनावणी पुढील वर्षीच होणार आहे.