सोलापूर,दि.१६ : सोलापूर शहरातील कोरोना रुग्णसंख्येत घट कायम आहे. सोलापूर शहर नवीन २ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २९३४५ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७८७० झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या २६ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४४९ झाली आहे. यात ९२८ पुरुष व ५२१ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ५०४ अहवाल प्राप्त झाले. यात ५०२ निगेटिव्ह तर २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात १ पुरुष आणि १ महिलांचा समावेश आहे. आज १ जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर ५ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

