सोलापूर,दि.8: सोलापूर शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख मनिष काळजे (Manish Kalje) यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी बेकायदेशीरपणे केलेल्या बदल्या व प्रतिनियुक्त्या, औषध खरेदीत कोट्यावधी रूपयांची वसुली त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकार्यांवर चौकशी करून बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी मनिष काळजे (Manish Kalje) यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली असल्याचे सांगितले.
शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख मनिष काळजे म्हणाले, आषाढी वारीतील औषध खरेदीत कोट्यवधी रुपयांची वसुली दाखवण्यात आली आहे. कोविड काळात कर्तव्यात कसूर, मुदतीत कामे पूर्ण न करणे यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच त्यांची इतरत्र बदली करून सोलापूर जिल्ह्यासाठी सक्षम जिल्हा आरोग्य अधिकारी देण्याची लेखी तक्रार व मागणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा Devar Bhabhi Dance: दीराच्या लग्नात चर्चा मात्र वहिनीची, वहिनीनी केला जबरदस्त डान्स
दुसरीकडे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बदलीचे धोरण नसताना व अधिकार नसताना बदल्या केल्या आहेत. वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळे डॉ. शितलकुमार जाधव यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी सीईओ दिलीप स्वामी यांना दिले आहेत.
त्यामुळे अशा पध्दतीने बेकायदेशीर बदल्या, प्रतिनियुक्त्या, औषध खरेदी, साहित्य खरेदी करणार्या भ्रष्ट जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांची चौकशी करून त्यांचे निलबंन व बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली असल्याचे सांगितले. त्यामुळे यावर आरोग्य मंत्री सावंत हे कार्य भूमिका घेणार आहेत ? याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.