आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी नाही केलं, ते तुम्ही करत आहात: उध्दव ठाकरे

0

मुंबई,दि.९: उध्दव ठाकरे यांनी “आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी नाही केलं, ते तुम्ही करत आहात” असे म्हणत जोरदार टीका केली आहे. गेल्या काही दिवसापांसून ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू होता. या वादानंतर शनिवारी ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली.

“दसऱ्या मेळाव्यात मी उल्लेख केल्याप्रमाणे आता शिवसैनिकांना दमदाटी करणे सुरू आहे. शिंदे गटात प्रवेश करा नाही तर तुमच्यावर केसेस पडतील अशा धमक्यांना देण्यात येत आहेत. ज्या शिवसैनिकांच्या जोरावर तुम्ही मोठे झालात, त्यांना धमक्या देताना काहीच वाटत नाही का? हेच तुमचं हिंदुत्त्व आहे का?” अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली.

“आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी नाही केलं, ते तुम्ही करत आहात. त्यावेळी शिवसेनेवर बंदी घाला असा प्रस्ताव इंदिरा गांधीकडे आला होता. मात्र, त्यांनी शिवसेनेवर बंदी न घालण्याचा निर्णय घेतला. त्यावेळीही शिवसैनिकांना त्रास होत होता, तडीपारीही सुरू होती, अनेकांना स्थानबद्ध करण्यात येत होते. पण काँग्रेसने कधीही शिवसेना संपवायचा प्रयत्न नाही केला. आज तुम्ही जे आरोप करता की काँग्रेसबरोबर जाऊन आम्ही हिदुत्व सोडलं, तर आज ज्यांचे शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहे, त्यांच्या मांडीला मांडी लाऊन तुम्ही सत्तेस बसला आहात. तर पापी कोण काँग्रेस की भाजपा?” असा प्रश्नही त्यांनी शिंदे गटाला विचारला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here