Ramdev Baba: योगगुरू रामदेव बाबा यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठं वक्तव्य

0

मुंबई,दि.30: योगगुरू रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. योगगुरू रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सत्तांतर घडवून आणले. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार गेले आहेत. एकनाथ शिंदे यांना अनेक ठिकाणी पाठिंबा मिळत आहे. आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावाही शिंदे (Shinde Group) गटाकडून करण्यात येत आहे.

योगगुरू रामदेव बाबा यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. फडणवीसांनी या भेटीचे काही फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहे. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. असं असतानाच आता रामदेव बाबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. “एकनाथ शिंदे हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरूष, शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत” असं म्हटलं आहे. 

आम्ही मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो, असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरूष आहेत. आपल्या राजधर्मासोबत ते आपल्या सनातन धर्म आणि ऋषीधर्माचं प्रामाणिकपणे पालन करत आहेत. त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो. बाळासाहेब ठाकरेंशी आमचे स्नेहसंबंध होते. शिंदे हे त्यांचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत असं आम्हाला वाटतं. या राजधर्मासोबत सनातन धर्माच्या प्रतिष्ठेबाबत आम्ही संवाद केला. फार चांगलं वाटलं” असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here