देहू कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांबाबत केला मोठा दावा

0

दि.16: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. मात्र या कार्यक्रमानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली. राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावरून ठिकठिकाणी आंदोलन केले.

यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले आहे. भाजपाच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी अजितदादांची विचारपूस केली. जेव्हा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं(Narendra Modi) नाव भाषणासाठी आले तेव्हा मोदींनी स्वत: अजितदादा बोलणार नाहीत का असं विचारलं. अजितदादांनी तुम्हीच बोला असं म्हटलं. इतका कार्यक्रम चांगला झाल्यानंतर जाणीवपूर्णक या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतोय. कदाचित अजित पवारांविरोधातच हे षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला. 

तसेच अजित पवार (Ajit Pawar) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) मनमोकळेपणाने बोलत होते. हे काहींना आवडलं नाही. त्यामुळे ही अजितदादांविरोधात ही त्यांची खेळी असू शकते. राजकारणात प्रत्येक गोष्टीचे अंदाज लावता येतात. त्यात तथ्य शोधून काढायला हवा. मला जे वाटतं ते मी सांगितले त्यामुळे ते शोधून काढण्याचं काम तुमचं आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे सूचक वक्तव्य केले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here