सोलापूर,दि.25: सोलापूर प्रभाग क्र.09 बाळे येथील राजेश्वरी नगर मधील स्ट्रेट लाईटस गेली 20 दिवस बंद पडली होती. तसेच जय मल्हार नगर, आकाश नगर, तोडकर वस्ती येथील स्ट्रेट लाईट सुद्धा बंद असल्याने परिसरातील नागरिकांनी राष्ट्रवादीचे युवा नेते बिज्जु प्रधाने व सुरेश तोडकरी यांच्याशी संपर्क साधून संबंधित अडचणी सांगितल्या व आज तात्काळ महानगरपालिका व महावितरण विभागाच्या मदतीने राजेश्वरी नगर, जय मल्हार नगर, आकाश नगर, तोडकर वस्ती येथील सर्व स्ट्रेट लाईट त्वरित दुरुस्ती करुन चालू करण्यात आल्या.
यावेळी नागरिकांच्या अडचणींची दखल घेऊन लाईटचा प्रश्न सोडवल्याबद्दल परिसरातील नागरिकांच्या वतीने बिज्जु प्रधाने व सुरेश तोडकरी यांच्या तत्पर कार्याचे कौतुक करुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी संबंधित परिसराची पहाणी करताना बिज्जू प्रधाने, माजी नगरसेवक सुभाष डांगे, मारुतीआण्णा तोडकरी, बाळासाहेब तांबे, हर्षल प्रधाने, नागनाथ क्षिरसागर, अशोक गुरव, मोहनभाऊ ढेपे, आनंद आतकरे, साळुंखे मामा, संदिप गाडेकर, विजय तांबे, विजय बाबरे, बळी ओव्हळ, जनार्दन कोलार, लखन सालगुडे, संभाजी गुंड, बजरंग गाडेकर, विशाल शिंगाडे, विजय काटकर, मुकेश घंटे, दिपक जगताप व आदी उपस्थित होते.