अकोला,दि.23: कोचिंग क्लासेसच्या संचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे. आरोपीवर पोलिसांनी पॉस्कोचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अकोला शहरातील चौधरी कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी याच्याविरुद्ध रविवारी अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी सिव्हील लाईन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 354 सह पोस्को व आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदवून सिव्हिल लाईन्स पोलिसांनी वसीम चौधरी याला अटक केली आहे.
आईच्या जागरुकतेनं प्रकार आला उघडकीस
वसिम चौधरी हा त्याच्या फोनवरून चॅटिंग करुन, तिला अश्लील ईमोजी पाठवायचा. चौधरीच्या अशा वागण्यामुळे ती खूप तणावात होती. यासोबतच वसिम चौधरीने तिला धमकीही दिली होती की, तू हे जर कोणाला सांगितले तर मी तुझे करिअर बरबाद करेल. त्यामुळे भीतीपोटी घडलेला प्रकार तिने कोणाला सांगितला नाही. कोचिंग क्लासेसला जाणे बंद केले. अन् घरीच ऑनलाईन क्लासेस सुरु केले. आज आईने तिला म्हटले की, ऑफलाईन क्लासेस चालू असतांना तू ऑनलाईन क्लासेस का करतेस, असे म्हणून ट्यूशन क्लासला जाण्यासाठी आग्रह केला. त्यानंतर या पीडित मुलीने सर्व घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. अशा प्रकारे झालेल्या घटनेची तक्रार तिने सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला दिली आहे. या तक्रारीनंतर चौधरी याच्यावर 354 (अ) (ड), 506, 10, 12 पॉस्कोअंतर्गत गुन्हे दाखल दाखल झाले असून अटक करण्यात आली आहे. 
अकोला येथील चौधरी कोचिंग क्लासचे संचालक वसिम चौधरी याच्याविरुद्ध रविवारी सायंकाळी सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार वसीम चौधरी याने मुलीसोबत मोबाईलवरून अश्लिल चॅटिंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला अभ्यासाच्या बहाण्याने घरी बोलावून तिच्यासोबत अश्लिल चाळे केल्याचेही तक्रारीत नमुद आहे. घाबरलेल्या मुलीने ही बाब पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांसोबत थेट सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशन गाठून वसीम चौधरी विरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली. पोलिसांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून विनयभंग करणे, पोस्को कलम नऊ एफ, 10 अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणे आणि आयटी ॲक्ट कलम सहा, सात (ब) मोबाईलवर अश्लील चॅटिंग करने आदी गुन्हे दाखल केले आहे. सिव्हील लाईन पोलिसांनी वसीम चौधरीला अटक केली आहे. 
 20 मे रोजी वसिम चौधरी याने पीडित अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर मेसेज पाठवून महत्वाचं बोलायचं आहे. असे म्हणून तिला क्लासला बोलाविले, त्यानंतर ती वसिम चौधरी यांच्या कोचिंग क्लासला दुपारी 5 वाजता घरून निघाली. अन् क्लासला गेल्यावर चौधरींनी तिला घरात बोलाविले आणि मागील रुममध्ये बसविले. आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अल्पवयीन मुलीने त्याला धक्का देवून बाहेर पळ काढला. अन् विरोध करत आरडाओरड केली.
 
            
