देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट केली भूमिका

0

दि.२०: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. भाजपा खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी केली होती.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यावर भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आज नृसिंह मंदिराला भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊतांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून टोला लगावला. “सहकार्य हवं असल्याचं सांगितलं असतं तर अयोध्येला जाण्यासाठी आम्ही सहकार्य केलं असतं”, असं संजय राऊत म्हणाले होते. यावरून फडणवीसांनी प्रतिटोला लगावला आहे.

संजय राऊत हे काही महत्त्वाची व्यक्ती नसल्याचं यावेळी फडणवीस म्हणाले. “ते सकाळी वेगळं बोलतात, संध्याकाळी वेगळं बोलतात. गेले तर कशासाठी गेले, नाही केले तर का नाही गेले? असं विचारतात. त्यामुळे अशा व्यक्तीला मी उत्तरं देत नसतो”, अशा शब्दांत फडणवीसांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

“राज ठाकरेंचं स्वागतच होईल”
“मला वाटतं राज ठाकरेंनी दौरा पुढे ढकलला आहे, रद्द केलेला नाही. आमची स्पष्ट भूमिका आहे, की जो रामभक्त अयोध्येला जाईल, त्याचं स्वागतच झालं पाहिजे. त्याला अडवणं चुकीचंच आहे. ते जेव्हाही जातील त्यावेळी त्यांचं स्वागतच होईल”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here