नवी दिल्ली, दि.२०: Reliance Jio आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड कॉल आणि डेटा फ्री देणार आहे. रिलायन्स जिओने घोषणा केली आहे की, कंपनी आसाममधील प्रभावित युजर्सना चार दिवस विनामूल्य अनलिमिटेड कॉल आणि डेटा ऑफर करत आहेत. टेलिकॉम ऑपरेटरने जाहीर केले आहे की, या उपक्रमांतर्गत, युजर्सना दररोज १.५ GB डेटा, १०० SMS / दिवस आणि अनलिमिटेडव्हॉइस कॉलिंग मिळेल. Jio ने मोफत सेवा देण्याचा निर्णय का घेतला आहे ते जाणून घेऊया. आसाममधील अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या युजर्सना मदत करण्यासाठी ही ऑफर म्हणजे रिलायन्स जिओचे एक पाऊल आहे. आसाममध्ये, दिमा हासाओ, कार्बी आंग्लॉन्ग ईस्ट, कार्बी आंग्लॉन्ग वेस्ट, होजाई आणि कचार या जिल्ह्यांमध्ये राहणा-या लोकांना रिलायन्स जिओकडून ही ऑफर देण्यात येत आहे.
ग्राहकांना मेसेज
जिओने आसाममधील ग्राहकांना पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून खराब हवामानामुळे तुमच्या सेवा अनुभवावर परिणाम झाला आहे. सदिच्छा म्हणून, आम्ही तुमच्या नंबरवर ४ दिवसांची अमर्यादित योजना लागू केली आहे. हे टेल्कोचे एक चांगले पाऊल आहे आणि ते परिसरात राहणाऱ्या Jio युजर्सना दिले जाईल. युजर्सना हा लाभ आपोआप मिळेल आणि त्यासाठी त्यांना काहीही पैसे द्यावे लागणार नाहीत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे गंभीर नुकसान झालेल्या लोकांना मदतीच्या स्वरुपात लाभ देण्यात आला आहे.