सोलापूर,दि.18: दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे भाषण करून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीचे निकालावर टीका करून बदनामी व जातीय द्वेष निर्माण केल्याप्रकरणी तसेच मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये ॲड. गुणरत्न निवॄत्तीराव सदावर्ते, वय-47 वर्षे, धंदा-वकील, रा. मुंबई यांना अटकपूर्व जामीनावर मुक्त करण्याचा आदेश सोलापूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश व सत्र न्यायाधीश पांढरे यांनी पारित केला.
यात हकीकत अशी की, मराठा आरक्षणाविरोधात जयश्री पाटील यांनी अँड.गुणरत्न सदावर्ते यांचे मार्फत मुंबई उच्च न्यायालय मध्ये दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांचे न्यायालयातून होऊन दि. 27/6/2019 रोजी न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरविले. त्यानंतर दि. 27/6/2019 रोजी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी टीव्ही 9 वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात न्यायमूर्ती रणजित मोरे साहेब हे मराठा जातीचे आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या दबावास सेटिंग वेटिंग करून मराठा समाजाचे बाजूने निकाल दिला व जातीय द्वेषातून न्यायमूर्ती ची बदनामी केली. तसेच जातीय द्वेष निर्माण केला. अश्या आशयाची फिर्याद योगेश नागनाथ पवार यांनी दाखल केलेली .होती त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनांने मराठा समाजाला डिसेंबर 2018 मध्ये आरक्षण दिले होते मराठा समाजाला आरक्षण दिले नंतर ॲड. जयश्री पाटील यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते याचे मार्फत मा उच्च न्यायालय मुंबई याच्याकडे आरक्षण विरोधात याचिका दाखल केली होती मराठा समाजाचे आरक्षण करिता सर्व समाजाचे एकत्रीकरण करीत असताना ॲड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली केली होती त्याचे वकील अँड. गुणरत्न सदावर्ते हे होते व सदर याचिका उच्च न्यायालय यांनी फेटाळली होती तेव्हा ॲड. सदावर्ते याची पत्नी जयश्री पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती सर्वोच्च न्यायालयाने अँड सदावर्ते यांची याचिका मंजुर केल्याने 5 मे 2021 रोजी मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. त्यानंतर दि.05/05/2021 रोजी अँड सदावर्ते यांनी मा.उच्च न्यायालय मुंबई येथे न्यायालयाचे बाहेर ए बी पी माझा ला बाईट दिली त्यामध्ये त्यांनी मराठा समाजाचे आरक्षण कोरोना व्हायरस प्रमाणे अल्ट्राव्हायरस आहे आरक्षणाच्या चष्मातुन गलीच्छ राजकरण होवु नये, आम्ही देणार नाही गुणरत्न सदावर्ते यांचा खुन जरी झाला तरी लढाई चालुच राहिल शरद पवार ,सुप्रिया सुळे, विश्वास नांगरे- पाटील, मराठा संघटना, मराठा समाजाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे एकत्रित होवुन जिव घेण्याचा प्रयत्न करित आहेत खुल्या प्रवर्गातील इतर समाजाकरिता असलेली लढाई यापुढे असेच चालू राहिल असे म्हणुन इतर समाजाच्या मनात मराठा समाजाबद्दल द्वेष निर्माण होईल असे हेतुपुरस्पर भाषण करून इतर जातीय लोकांना भडकाविले आहे ॲड. सदावर्ते यांनी मराठा समाजाविषयी द्वेषभावना पसरवुन मराठा समाज व पोलिसांविषयी आक्षेपार्ह बोलून मराठा समाजाविरुद्ध जातीय तेढ निर्माण होवुन सार्वजनिक शांतता भंग होईल असे चिथावणीखोर वक्तव्य केले असल्याचे फिर्याद माऊली पवार यांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती.
यात अटक होण्याच्या भीतीने ॲड. गुणरत्न निवृत्तीराव सदावर्ते यांनी ॲड. संतोष न्हावकर यांचेमार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणेसाठी धाव घेतलेली होती.
अटकपूर्व जामीन अर्जावर युक्तिवाद करताना ॲड.संतोष न्हावकर यांनी “ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी फिर्यादीची बदनामी केलेली नाही. जवळपास तीन वर्षानंतर राजकीय फायद्यासाठी फिर्याद दाखल झालेली आहे.फिर्यादीने कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करताना शासनाची पूर्व परवानगी घेतलेली नाही व आरोपीस नोटीस दिलेली नाही.” असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व त्या पृष्ठार्थ गाजलेल्या बाळासाहेब ठाकरे वि. महाराष्ट्र सरकार या खटल्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा संदर्भ दिला. सदर अर्ज मान्य करून न्यायालयाने ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना दोन्ही प्रकरणात रक्कम रुपये 15 हजार रुपयांचे अटकपूर्व जामिनावर मुक्त करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
यात आरोपीतर्फे ॲड.संतोष न्हावकर, ॲड. वैष्णवी न्हावकर , ॲड.राहुल रूपनर, ॲड. शैलेशकुमार पोटफोडे यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲड. दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले.